दीपक खिलारे
इंदापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्हा संघटकपदी सीमा कल्याणकर यांची निवड करण्यात आली. या आशयाचे पत्र पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे हे उपस्थित होते.
या निवडीनंतर बोलताना सीमा कल्याणकर म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, आनंद दिघे यांचा विचार रुजविण्यासाठी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.
सीमा कल्याणकर यांनी विकासधारा मंच व बेटी की रोटी अंतर्गत महिलांना स्वयंपूर्ण विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यांमार्फत महिलांचे चांगले संघटन उभे केले आहे.