-दीपक खिलारे
इंदापूर : पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा टी. डी. एफ व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांचे संयुक्त विद्यमाने, दिला जाणारा यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श शिक्षक व गोखळी (ता. इंदापूर) येथील गुरुकुल विद्या मंदिराचे सर्वेसर्वा बाळासाहेब हरणावळ यांना, आमदार संजय जगताप यांच्या हस्ते, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सन्मान सोहळा आचार्य अत्रे सभागृह, सासवड (ता.पुरंदर) येथे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थित पार पडला. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी बाळासाहेब हरणावळ यांना जिल्हास्तरीय, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने विशेष अभिनंदन केले आहे.
यावेळी प्रतिक्रिया देताना बाळासाहेब हरणावळ म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोपी अध्ययन पद्धतीने, अद्यावत शिक्षण प्रणाली शिकवण्यामध्ये मोठा आनंद आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये, यशस्वी होताना दिसतो आहे. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने माझ्या कार्याचे मूल्यमापन करून, जो सन्मान केला. त्यामुळे अधिकची विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी, यशस्वीरीत्या पार पाडणार असल्याची माहिती, बाळासाहेब हरणावळ यांनी दिली.