पुणे : बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाची बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल ही उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुरु झाली आहे. शाळेचा पहिला दिवस हा चिमुकल्यांसाठी अतिशय उत्साहाचा आणि जल्लोषाचा होता. शाळेतील मुलांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन हे उत्कृष्ट पध्दतीने केले होते. सर्व मुलांचे औक्षण करून त्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले.
शाळेतील प्रथम दिवसाची सुरुवात ही परिपाठाने झाली. यामध्ये मुलांनी विविध प्रकारच्या कला सादर केल्या गेल्या आणि त्यानंतर मुलांसाठी जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जादूच्या कार्यक्रमांमध्ये दाखवल्या गेलेल्या विविध कलांना मुलांनी अतिशय भरभरुन असा वाव देऊन त्या विविध करामतीचा मनसोक्त आनंद घेतला. शिक्षकांनी वर्गामध्ये विविध विषयांच्या ॲक्टिव्हिटी घेतल्या. त्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेशभुषेत आलेल्या मुलांनी वर्गात जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत त्यांना चॉकलेटचे वाटप केले.
मा. चेअरमन सदाशिव अण्णा पवार आणि मुख्याध्यापक गणेश मितपल्लीवार यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.