पुणे : दिव्यांगाना निधी दिला नाही तर आम्ही तुमच्यासोबत आमदार जरी असलो तरी ‘आपको हम भूल जायेंगे’ असं म्हणत सरकारमधून बाहेर पडण्याचा थेट इशारा दिला आहे. दिव्यांगाच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. पुण्यात दिव्यांगाच्या भव्य नोकरी कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर बॅकछु कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत महायुतीत सहभागी झाले होते. मात्र, आता तेच बच्चू कडू मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहेत.
बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजे. दिव्यांगांचं भलं कसं होणार. नोकरी नाही तर दिव्यांगांना उद्योगासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी काम करणे गरजेचं आहे. मागील ७५ वर्षांत दिव्यांगांसाठी काही खास काम झालेले नाही. अनेक गोष्टी करणं बाकी आहे, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीने मोठा गोंधळ होईल. आई-वडील असेल तर वडिलांचा धर्म लागतो. हा मोठा चिंतेचा विषय आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा. यातून मार्ग काढावा, २४ डिसेंबरच्या आत काही लोकांना आरक्षण मिळालच आहे. हे त्याच्या आंदोलनाच यश आहे. मुख्यमंत्री यांनी भूमिका घेतली आणि कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.