पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अशातच या हत्येप्रकरणी पुण्यातील वारजेतून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मोनू आणि गुल्लू असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, अटक केलेल्या दोघांचा हत्येप्रकरणात कशा प्रकारचा सहभाग आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या रूममधून गुल्लू आणि मोनु या दोन जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे 3 तरुण हे वारजे परिसरातील बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये काम करत होते. हरीष नावाच्या ठेकेदाराने या सगळ्यांना एक रूम भाड्याने करून दिली होती. याच परिसरात असलेल्या या रूममध्ये हे 5 जण राहत होते. गुल्लू आणि मोनु यांचा काही या प्रकरणी काही सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वांद्रे सिग्नलवर नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला