यवत : अखिल भारतीय मराठा महासंघ व कासुर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कासुर्डी गावातील विठ्ठल मंदिरात ‘आयुष्यमान भारत कार्ड’चे शिबीर आयोजित करण्यात आले होते. याला कासुर्डी व आसपासच्या परिसरातील २७५ नागरिकांनी यात सहभाग घेतला.
कासुर्डी येथे यापूर्वी देखील असेच शिबिर घेण्यात आले होते. त्यावेळी १३० ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता. नागरिकांच्या मागणीमुळे रविवारी पुन्हा शिबिर घेण्यात आले. याला मोठा प्रतिसादही मिळाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांढेकर, दौंड तालुका संपर्क प्रमुख गणेश दिवेकर, दौंड तालुका युवक उपाध्यक्ष प्रशांत ताडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच पांडुरंग आखाडे, मराठा महासंघ जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, दौंड तालुका उपाध्यक्ष संतोष पोपट आखाडे, तालुका विद्यार्थी सचिव सुरज वसंत आखाडे, दौंड तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत आखाडे, दौंड तालुका व्यापार उद्योग आघाडी कार्याध्यक्ष अमोल चौंडकर यांनी केले होते.
या कार्यक्रमाला कासुर्डी गावचे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, कासुर्डी विकास सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि गावातील विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते. Ayushyaman Bharat Card camp at Kasurdi 275 villagers Participate