पुणे: पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन, महाराष्ट्र आर्ट ऑफ लिव्हिंग व महा एनजीओ फाउंडेशन यांच्यावतीने पुणे शहरात रविवार (ता.२१) पासून शहरात मतदार जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही दिनानिमित्त ‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमेचा शुभारंभ सेंट्रल पार्क, पुणे येथे करण्यात आला. स्वामी ब्रम्हचैतन्यजींच्या उपस्थितीत रुद्र पूजन आणि हनुमान चालीसाच्या जपासाठी शिक्षक, स्वयंसेवक आणि पुण्यातील नागरिकांसह 700 हून अधिक एओएल भक्त उपस्थित होते. यावेळी पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे ध्रुव रुपारेल, एओएल महाराष्ट्र ऍपेक्स बॉडीचे सदस्य राजय शास्तारे, पांडुरंग शेळके, शेखर मुंदडा, महा एनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष पीपीसीआरचे मनोज पोचट आदी मान्यवर उपस्थित होते.
मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवल्यानंतर पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणेचे सदस्य 1 लीटर तेलाच्या खरेदीवर 50 रुपयांचे इंधन मोफत देणार आहेत. ही योजना 20 मे 2024 पर्यंत वैध असेल. एओएल कुटुंबाने पीडीए पुणे, महाएनजीओ आणि इतर एनजीओसोबत पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा संकल्प केला आहे. यासाठी खास मोबाइल फोन ॲप्लिकेशन आणि वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.
मतदार त्यांच्या मोबाईल फोनवर क्यूआर कोड स्कॅन करून किंवा वेबसाइटला भेट देऊन त्यांचे मतदान केंद्र सहज शोधू शकतात. एओएल स्वयंसेवक घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करतील. ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना त्यांच्या मतदान केंद्रावर मदत केली जाईल. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना 20,000 हून अधिक पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
एओएल प्रत्येक निवडणुकीदरम्यान ही सेवा करत आहे. यावेळी, ते मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार आहे. यातून प्रेरित होऊन अनेक स्वयंसेवी संस्था या मोहिमेत सामील झाल्या आहेत. पुढील आठवड्यापर्यंत सुमारे 10 आणखी समर्थन देतील. पुण्यात सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी स्वयंसेवक, शिक्षक आणि नागरिकांनी संकल्प केला आहे.
दरम्यान, आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था या मोहिमेला मोठे यश मिळवून देण्यासाठी सहभागी होत आहेत. पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (पीडीएपी) आणि महा एनजीओ फेडरेशनने त्यांच्या या मोहिमेला पाठींबा दिला आहे.