पुणे : भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवाशक्ती, “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” यांच्यावतीने भागवत पंथाच्या पताक्याची शान उंचावण्याच्या तसेच आपल्या वारकरी संप्रदायातील विठ्ठलभक्तीचा वारसा येणाऱ्या पिढीला बहाल करण्याच्या हेतूने आषाढी एकादशी योगी “श्री बाल माऊली वेशभूषा संमेलन ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या यंदाच्या या चौथ्या वर्षीही या अभिनव संकल्पनेस शेकडो बाल माऊलींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
नियोजित संमेलनाच्या माध्यमातून समितीने मुलांनी परिधान केलेल्या वारकरी वेशभूषेसाठी शिवांश निलेश भोंडवे (शिवणे, पुणे), अद्वैत अपर्णा रोहीत भोसले (धनकवडी, पुणे), कियांश चेतन येवले (चंदननगर, पुणे), शिव गोपाल टुकड़िया (खराडी, पुणे) यांना प्रमुख चार पारितोषिके आणि अद्वित हेमा चेतन चौधरी (भोसरी, पुणे), रायबा रोहित जाधव (बोपखेल, पुणे), देवांश संजय नाईकरे (कमान, पुणे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान केली.
मुलींनी परिधान केलेल्या वारकरी वेशभूषेसाठी शार्वी अमोल कदम (आंबेगाव पठार, पुणे), नव्या राहुल उपाडे (चंदननगर, पुणे), क्रिशा संतोष दिवेकर (टेमघर पाडा, भिवंडी), शरण्या गौरव फलके (केशवनगर, पुणे) यांस प्रमुख चार पारितोषिके आणि आद्या वृषाली रोहित पवार (दिघी, पुणे), वेदिका राहुल राजगुरू (गांधीनगर, पुणे), श्रावी श्रद्धा अनिकेत खिरीड (कात्रज, पुणे) यांस उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान केली.
लाखो वारकरी ज्यांच्या दर्शनासाठी वारीच्या माध्यमातून शेकडो मैल चालत जातात अशा श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी यांच्या भक्तीने प्रेरीत अशा अव्दिक गणेश ढगे (धानोरी, पुणे), सर्वज्ञ विशाल देशमुख (पिंपळे गुरव, पुणे), रेवा योगेश देवकर (रामवाडी, पुणे), त्रिशीका मनोज घुमटकर (राजगुरूनगर, पुणे) या बाल माउलींनाही उत्कृष्ट वेशभुषेबद्दल गौरविण्यात आले.
या संमेलनासाठी उत्स्फुर्त सहभाग दर्शविल्या बद्दल सर्व नोंदणीकृत बाल वारकऱ्यांना समितीच्या वतीने आकर्षक ऑनलाईन प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व विजेत्यांना एका छोटेखानी कार्यक्रमातून जाहीर झालेली सर्व पारितोषिके समितीच्या मानद सदस्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
आपल्या पाल्यास आयुष्यातील पहिलेच पारितोषिक प्राप्त झाल्याने कित्येक लहान माऊलींच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या अतुल्य संधिबद्दल सर्वांनी समितीप्रती ऋण व्यक्त करण्याची इच्छाही बोलून दाखविली. समितीच्या या कार्यक्रमास अतिशय उत्साहाने भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानल्याचे समितीचे प्रमुख सदस्य सागर सुभाष नाईकरे यांनी नमूद केले.