युनूस तांबोळी
शिरूर: Shirur News -पुणे जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागातर्फे देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षीका पुरस्कार कवठे येमाई ( ता. शिरूर ) (Shirur News) येथील अंजना पांडूरंग हारके यांना देण्यात आला. शिरूर प्रकल्प एक मधील टाकळी हाजी बिटा मध्ये सध्या त्या कार्यरत असून त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. (Shirur News)
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षीचा पुरस्कार
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गतसन २०२१-२०२२ या वर्षामध्ये केलेल्या वेगवेगळ्या उपक्रम व कामाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बिट स्तरावर अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार, कुपोषण निर्मुलन, परसबाग, लोकसहभाग, अंगणवाडी इमारत, अंगणवाडी सक्षमीकरण यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षीका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उच्चतंत्र शिक्षण व वस्त्रउद्योग व संसदिय कामकाज तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. गिराशे आदी उपस्थित होते. या कार्यासाठी प्रकल्प एक चे प्रकल्प अधिकारी रेश्मा रेडेकर, प्रकल्प दोन च्या प्रकल्प अधिकारी निर्मला चोबे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संगीता बेंगाळ, विस्तार अधिकारी पूनम मराठे यांनी त्यांना सहकार्य केले आहे. त्यांना या पुरस्कारासाठी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
२००६ मध्ये जुन्नर मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षीका म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर आंबेगाव व शिरूर येथे त्यांनी पर्यवेक्षीका म्हणून काम केले आहे. सध्या शिरूर तालुक्यातील प्रकल्प एक मध्ये टाकळी हाजी येथे का४यरत आहेत. माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, माजी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे , माजी सरपंच दामुआण्णा घोडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.