-पोपट पाचंगे
कारेगाव : रांजणगाव गणपती, (ता.शिरुर) येथील प्रगतीशील शेतकरी नानासाहेब दिनकर पाचुंदकर यांच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापूर येथील अंबाबाई देवीचा मंदिर गाभारा व मंदिर परिसरात विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
पाचुंदकर यांच्या वतीने नवरात्रौत्सवानिमित्त दरवर्षी अंबाबाई मातेला फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते. या सजावटीमध्ये शेवंतीची 500 किलो ,झेंडूची 700 किलो, अष्टरची 200 किलो तसेच गुलाबाची 400 किलो, अंथोरियमची 100 किलो व आर्चिडची 50 गड्डी फुले व इतर साहित्य वापरून मंदिर गाभारा व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिर गाभारा व परिसरातील फुलांच्या या आकर्षक सजावटीचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कौतुक केले.
फुलांची आकर्षक सजावट केल्याबद्दल प्रगतीशील शेतकरी पाचुंदकर यांच्यासह युवा उद्योजक मानसिंग पाचुंदकर, ज्ञानेश्वर पाचुंदकर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.