पुणे : पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार घडला आहे. डिलिव्हरी बॉयने पार्सल देण्याच्या बहाण्याने घरी येऊन अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना वाघोली परिसरात घडली आहे. याबाबत पिडित मुलीच्या 29 वर्षीय आईने आरोपी विरोधात वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केलाआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक डिलिव्हरी बॉय घरी पार्सल देण्याच्या बहाण्याने आला. त्याने घरात शिरुन मुलीच्या शरीरास आक्षेपार्ह स्पर्श करुन त्याने स्वतःचे कपडे काढून मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मलीने कपडे काढण्यास विरोध केला व ती जोरात रडायला लागली. मुलगी जोरजोरात रडण्यास लागल्यानंतर आरोपी सोफ्यावर बसला व तिला मांडीवर बसवून रडू नकोस म्हणून मांडी हलवू लागला.
तिच्या शरीरावर आक्षेपार्ह स्पर्श करुन त्यामुळे मुलगी अजून जोरात रडण्यास लागली. आरेपीने तिला धमकावून शांत करत तिला घडलेला प्रकार कोणाला सांगू नको, अशी धमकी देऊन घरातून निघून गेला. या घटनेनंतर मुलीने आईला फोन करुन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध वाघोली पोलिस करत आहेत.