पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीला पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा आहे. मात्र, पत्नी घटस्फोट देत नव्हती. दरम्यान, पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र, घटस्फोट देत नसल्याचा राग अनावर झाल्याने पत्नीला मारहाण करीत जीवे ठार् मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी पतीवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना भुसारी कॉलनी कोथरूड येथे राहत्या घरी १८ जून रोजी घडली. याप्रकरणी ३७ वर्षीय पत्नीने पतीविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नी दोघे भुसारी कॉलनी येथे राहण्यास आहेत. दोघांमध्ये सतत कौटुंबिक वाद होत आहेत. दरम्यान, पती पत्नीकडे सातत्याने घटस्फोटासाठी मागणी करीत आहे.
मात्र, पत्नी घटस्फोट देत नव्हती. पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र, घटस्फोट देत नाही याचा राग मनात धरून त्याने तिला ढकलून दिले. तसेच तिचा गळा दोन्ही हाताने दाबून तिला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. तसेच तिला जीवे ठार् मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पॉलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.