-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील हार्डवेअर दुकानात रात्रीच्या वेळी चोरी करणारा अट्टल आंतरराज्य गुन्हेगाराला साथीदारासह पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. गुन्हेगाराने पाच गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. त्याच्याकडून 5 लाख 4 हजार सहाशे रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.
बनवारी उर्फ राजू मोहनलाल मीना (रा. रामलिंगरोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे), अक्षय प्रकाश चेंडे (वय 25 रा. वाभुळसर खुर्द, संस्कृती पार्क कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) याला अटक केली आहे. आरोपीने हे चोरीचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने केल्याचे कबूल केले आहे.
अटक केलेला आरोपी बनवारी उर्फ राजु मोहनलाल मीना (रा. रामलिंगरोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र व राजस्थान राज्यात मालमत्तेविरुध्दचे एकूण 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजस्थान राज्यातील सराईत गुन्हेगार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मागील महिन्यात हार्डवेअर दुकानांमध्ये चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका कडून सुरू होता. या पथकाने सीसीटीव्ही तपासून चोरीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अट्टल रेकॉर्डवरील गुन्हेगार बनवारी व राजू मीना व अक्षय चेडे हे कोरेगाव तालुका शिरूर येथे येणार असल्याचे समजल्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत तीन तर यवत पोलीस स्टेशन हद्दीत दोन असे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून गुन्हयांतील चोरी गेलेली पिकअप गाडी, हार्डवेअर दुकानातील पत्रा, कंपाउड जाळी, धान्याच्या गोनी असा एकूण 5 लाख 4 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर चे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जर्नाधन शेळके, संजु जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, अतुल डेरे, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ तसेच शिरुर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक मुजावर, सहाय्यक फौजदार देशमाने यांनी केली आहे.