थेऊर : कुंजीरवाडी येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोरया वन सोसायटी कुंजीरवाडी आयोजित यांच्याकडून या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुंजीरवाडीमध्ये पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना गुणगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
गुणगौरव पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे :
आरोग्यदूत पुरस्कार – युवराज काकडे
पत्रकारिता पुरस्कार – सिताराम लांडगे
आदर्श पोलीस पाटील पुरस्कार – रेशमा कांबळे
विधीज्ञ पुरस्कार – श्रीकांत भिसे
आदर्श शिक्षक पुरस्कार -हरिश्चंद्र भरीत
आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार – सचिन गायकवाड
उद्योजक पुरस्कार – रामशकल गुप्ता
वैद्यकीय पदवी पुरस्कार – अक्षता बडेकर, सिद्धी पाटील
संगित क्षेत्र पुरस्कार – शिवराज साने
या कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष साखर कामगार महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब काळे हे होते.
यावेळी बोलताना शशिकांत चव्हाण म्हणाले की, महामानवांना डोक्यावर घेण्यापेक्षा महामानवांचे विचार डोक्यात घेऊन कार्य करावे. आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिप्रेत असणारी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. त्याबद्दल संयोजकांचे मी आभार व्यक्त करतो.
बहुजन दलित महासंघाचे अध्यक्ष आनंद वैराट, विद्यमान सरपंच हरेश गोठे, उपसरपंच गोकुळ ताम्हाणे, सदस्य संग्राम कोतवाल, माजी ग्रा. पं. सदस्य योगेश गायकवाड, बाबा भिसे, बापू घुले, मनोज चौधरी, शिवसेना उबाठा स्वप्निल कुंजीर, साईनाथ लोंढे, राजू गायकवाड, अमोल लोंढे, गोरोबा पवार ,सिद्धार्थ गायकवाड, प्रदीप शेंडगे, पवन गुप्ता, पत्रकार पंढरीनाथ नामगुडे, दिगंबर जोगदंड, प्रा. पत्रकार सचिन माथेफोड आदी मान्यवर पुरस्कारर्थी, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .