लोणी काळभोर Loni Kalbhor News : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील क्रीडा शिक्षक अशोक जाधव यांची राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ( Loni Kalbhor News)
दरवर्षी राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
दिव्यांगाच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दरवर्षी राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय / निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. हा शासन निर्णयामधील क्रीडा विषयक अर्हता यामध्ये राज्यस्तरीय दिव्यांग क्रिडा स्पर्धा याचाही समावेश करण्यात आलेला आहे.
सद्यःस्थितीत राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या स्पर्धकाचा समावेश थेट राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यात येते. त्यामुळे राज्यातील ३६ जिल्हयांमधून दिव्यांगांच्या विविध प्रवर्गातून स्पर्धक तसेच त्यांचे सोबती व काळजीवाहक यांचे राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये मोठया प्रमाणात सहभागी होत असल्याचे दिसुन येत आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने जिल्हास्तर, विभागस्तर त्याचप्रमाणे राज्यस्तर निश्चित होऊन त्याप्रमाणे क्रीडा स्पर्धा आयोजनाचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
दिव्यांगांच्या क्रीडा धोरणाचा आराखडा निश्चित करून क्रीडा धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा समितीमध्ये १७ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या सदस्यांमध्ये लोणी काळभोर येथील अशोक जाधव यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्याचे दिव्यांग उपायुक्त काम पहाणार आहेत. इतर सदस्य पुढील प्रमाणे आहेत.
क्रीडा आयुक्त, क्रीडा विभागाचे उपसंचालक, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण आधिकारी, दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे निरीक्षक, बाल कल्याण संस्थेचे व्यवस्थापक, क्रीडा शिक्षक अशोक जाधव, अशोक नांगरे, प्रशांत गडदे, राजेंद्र सुतार, ज्योती बोरुडे, कैलास गायकवाड, संतोष पठारे, अभिजित तांबे, दिगंबर तारडे, गीता ठकार यांचा या समितीत समावेश आहे.
या समितीने विविध विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धा / क्रीडा धोरणाचा, विविध प्रवर्गातील दिव्यांगांच्या स्पर्धा व नियमावलीचा अभ्यास करुन दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळा / मतिमंद बालगृहे यामधील विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता क्रीडा धोरणाचा आराखडा निश्चित करून क्रीडा सर्व समावेशक धोरणाचा मसुदा एक महिन्याच्या आत तयार करुन राज्य सरकारला अहवाल सादर करायचा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोरच्या सरपंचपदी योगेश काळभोर यांची बिनविरोध निवड..!