लोणी काळभोर : निसर्गाचा काही नेम नाही, कधी पाऊस लांबणीवर पडतो तर कधी अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मग अशावेळी शेतकरी हतबल होऊन जातो. परंतु राज्यसरकारने आता पीक विमा योजना सुरू केली आहे. त्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवू शकता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो पिक विमा लवकर काढून घ्या, असे आवाहन लोणी काळभोरचे पोलीस पाटील दत्तात्रय उर्फ दादा पाटील काळभोर यांनी केले आहे.
पुढे बोलताना काळभोर म्हणाले की, पीक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. तसेच त्या खात्याला आधार कार्ड लिंक असावे. कारण तुम्हाला मंजूर झालेली रक्कम ही आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यात जमा होते. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकते प्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. नागरिकांनी आपल्या जवळच्या पिडीसी बँकेत, शेतकी अधिकारी अथवा ऑनलाईन पिकविमा नोंदवा. व शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा.
दरम्यान, पीक विमा योजनेत शेतकरी स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठीचा अर्ज प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट pmfby.gov.in वर करता येतो. याव्यरिक्त CSC चालक अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास याबाबतची तक्रार नोंदवता येते. त्यासाठीचे संपर्क क्रमांक कृषी विभागानं उपलब्ध करुन दिले आहेत. तक्राराची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे शासनाने म्हटलं आहे.