पुणे : राज्यात जेएन-१ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक पुण्यात आढळली आहे. पुणे जिल्ह्यात रुग्णाची संख्या १५० वर पोहचली आहे. मागील आठवड्यात जेएन-१ व्हेरियंटच्या राज्यातील रुग्णांची संख्या १३९ वरून आता थेट २५० वर गेली आहे. यामध्ये राज्यात पुण्यानंतर नागपूरमध्ये ३०, तर मुंबईमध्ये २२ रुग्ण आढळले आहेत.
जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालानुसार, १ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२३ च्या दरम्यान आढळलेल्या आरटीपीसीआर कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. यामध्ये नवीन १११ रुग्णांमध्ये जेएन-१ व्हेरियंट आढळून आला आहे. सध्या राज्यात जेएन-१ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या २५० झाली आहे.
जेएन-१ व्हेरियंट रुग्णांची सर्वाधिक संख्या
पुणे जिल्ह्यात १५० आहे. त्याखालोखाल नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, ठाणे ७, जळगाव ४, अहमदनगर ३, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, नादेड २, कोल्हापूर २, धाराशिव २, नाशिक २, अकोला १, रत्नागिरी १, सिंधुदुर्ग १, सातारा १, यवतमाळ १ अशी एकूण २५० रुग्णसंख्या झाली आहे.