-भरत रोडे
कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आर्यन सचिन बोऱ्हाडे हा पालघर जिल्हा सफाळे येथील राजगुरू ह.म.पंडित विद्यालय येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणीत पात्र ठरला आहे. आर्यनने कब्बडी खेळामध्ये 14 वर्षे वयोगटात खेळताना शालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी दाखवली आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी दाखवत आर्यनची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलीआहे.
आर्यनने विविध स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने चमक दाखवली. ज्यामुळे त्याची या महत्त्वपूर्ण स्तरावर निवड करण्यात आली. त्याच्या या कामगिरीमुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून त्याच्या कुटुंबीयांसह शाळेतील शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. आर्यनची ही निवड त्याच्या कठोर परिश्रमाचा आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेचा पुरावा आहे.
या निवडीबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या शारदा मिसाळ, सरपंच वर्षाराणी बोऱ्हाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लंघे, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य सचिन बोराडे, अविनाश पोकळे, पांडुरंग भोर, बाळ श्रीराम गुंजाळ यांनी आर्यन व त्याला मार्गदर्शन करणारे प्रमोद भोईर, गणेश शेळके, कंठाळी चव्हाण आधी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.