– अमोल दरेकर
शिरुर (पुणे) : अष्टविनायक पैकी एक असणाऱ्या रांजणगाव महागणपती येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थान यांच्यावतीने अर्थवशीर्षपठण आयोजन करण्यात आले. यावेळी भाविकांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली.
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर गाभा-यासह परिसरात विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी सामुहिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगेचे व्यवस्था करण्यात आली होती. पहाटे पासूनच गर्दी केली होती. शेकडो जणांनी सहभाग घेत अर्थवशीर्षपठण केले. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
“दीड वर्षातून पहिल्यादांच अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पहाटे पासूनच शेकडो भाविक याठिकाणी अर्थवशीर्षपठणासाठी उपस्थित असल्याने आणि येणाऱ्या प्रत्येकासाठी फराळाची व्यवस्था केली आहे.
– स्वाती दत्तात्रय पांचुदकर (अध्यक्ष रांजणगाव महागणपती देवस्थान)