शिरूर, (पुणे) : अर्रर्र काय गर्दी म्हणायची की काय…? पुरता जिल्हा लोटलाय कृषी महोत्सवाला…कपडे, चटणी, लोणचे पापड, ज्यूस आइसक्रिम,पेढे, आर्युवेदिक औषधे सुद्धा, वेगेवेगळी फुल, फळ. भाज्या आणि परसबागेतील शेती कशी करावी याच ज्ञान, दुचाकी, चारचाकी, तंत्रशुद्ध शेती उपयोगी औजार काय पहाव अन काय खाव की काय घ्याव…? कृषी महोत्सवात आलेल्यांच अस्स झालय…आज दुसऱ्या दिवशी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सवाला आलेल्यांची ही अवस्था.
या ग्लोबल कृषी महोत्सवात खवय्यांना मसालेदार मासळी अन तांदुळ, ज्वारी, बाजरीची भाकर अन मटनाचा रस्सांवर ताव मारताना खवय्यांची नुसती धम्माल मज्जा.
नारायणगाव ( ता. जुन्नर ) येथे कृषी विज्ञान केंद्रात ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सवाला सुरवात झाली. दुसऱ्या दिवशी देखील शेतकरी व खवय्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती. जुन्रर, आंबेगाव, शिरूर, राजगूरूनगर, मावळ, मुळशी या तालुक्यातून हे एकमेव कृषी विज्ञान केंद्र आहे. या कृषी विज्ञान केंद्राला जिल्ह्यातून शेतकरी व खवय्यांनी भेट दिली.
अहमदनगरचे सेंद्रिय शेती प्रशिक्षक प्रकाश मगर यांनी नैसर्गीक व सेंद्रिय शेती विषयक माहिती दिली. पशुवैद्यकिय तज्ञ महेश पारखे यांनी आर्वेदिक पशू उपचार पद्धती यावर मार्गदर्शन केले. पुणे कृषी महाविद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॅा. धमेंद्रकुमार यांनी शाश्वत ऊस उत्पादनासाठी हवामान व खोडवा व्यवस्थापन याची माहिती दिली.
कृषी प्रदर्शनात सहभागी व्हा अन आकर्षक बक्षीसे मिळवा…
या ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सवात महाभाग्यवंत शेतकरी बक्षीस सोडत ११ फेंब्रुवारीला आहे. त्यासाठी कुपन दिले जात आहेत. यामध्ये दुचाकी, कडबा कुट्टी, फवारणी पंप, टिव्ही, सायकल, पंखा, मिक्सर या सारख्या उपयोगी वस्तू बक्षीसाच्या स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत. दररोजची सोडतीवर बक्षीसे देण्यात येणार आहेत.