भिगवण : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे श्री स्वामी समर्थांच्या जयघोष करत नुकतेच सोलापूर जिल्ह्याचा निरोप घेऊन पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर येथे श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळ्याचे आगमन झाले. भाविकांनी स्वामींच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात श्री स्वामी महाराज की जय ! जयघोष करत स्वागत केले.
यावेळी वालचंदनगरकरांनी दारोदारी सडा रांगोळी काढून हातात आरती निरजनी घेऊन पालखीचे स्वागत केले. वालचंदनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मेन कॉलनी, नवीन बाजारपेठ, येथे ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ललिताबाई मंगल कार्यालयात पालखी मुक्कामाला थांबली.
वालचंदनगरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे आगमन होत असते. यंदाचे पालखी सोहळ्याचे २५ वे वर्षे असून, संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावीच्या स्वामी भक्तांना समर्थांचे दर्शन घेता यावे, म्हणून पराक्रमा चालू केली आहे. शिवजयंती दिवशी पालखी सोहळ्याचे वालचंदनगरीत आगमन झाल्याने परिसरातील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
महिला लहान मुलासह ज्येष्ठांनी या सोहळ्यात सहभाग घेतल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. तर संपूर्ण परिसर स्वामी समर्थांच्या जयघोषात दुमदुमला होता. सायंकाळी ६ वाजता वालचंदनगर येथील हनुमान मंदिर पालखी दर्शनासाठी विसावा घेण्यात आली. त्या ठिकाणी भारत चिल्ड्रन्स अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज शाळा समितीचे अध्यक्ष पंकज पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
दरम्यान, येथील ललित बाई मंगल कार्यालयात हा पालखी सोहळा विसावल्यानंतर रात्री ज्येष्ठ सल्लागार अतुल तेरखेडकर, राम कुंभार, राजू भाटिया, जितू दुरुतकर, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सचिव अमोल राजपूत, खजिनदार निलेश चव्हाण, विजय कांबळे, संतोष दहिदुले, उमेश सगरे, शंकर काटे, हणमंत कुंभार, खंडू कुंभार, राजेंद्र फडतरे, विलास शेटे सर्व स्वामी भक्त उपस्थित होते.
अक्कलकोट स्वामी समर्थांची पालखी देवघर परिसरात आल्यानंतर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर ललिताबाई लालचंद मंगल कार्यालयात वालचंदनगर कंपनीचे वॉइस प्रेसिडेंट धीरज केसकर याच्या हस्ते आरती करण्यात आली.
दरम्यानच्या काळात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील उपस्थिती लावत स्वामी समर्थांची दर्शन घेत यावेळी मंडळाकडून उचित असा सन्मान करण्यात आला. माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. वालचंदनगर कंपनीचे वॉईस प्रेसिडेंट धीरज केसकर याच्या हस्ते आरती करण्यात आली.