Arrested | पुणे : वाघोली येथील गोडाऊन आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शुभ सजावटचा मालक आशिष अगरवाल (वय ४०, रा. बिबवेवाडी) या आरोपीला लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
वाघोलीतील साई सत्यम पार्क, उबाळेनगर येथील शुभ सजावट गोडावून आग लागून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) कमल मुकुल बार, वय २५ वर्षे व त्याचा भाऊ उत्तम मुकुल बार, वय २७ वर्षे, धंदा-मजुरी, रा. ग्राम जादूपुर दिर्घग्राम, राज्य पश्चिम बंगाल २) बिश्वजित सन्यासी सेन, वय २७ वर्षे धंदा मजुरी, रा. जि. पूर्व मेदनीपुर, राज्य पश्चिम बंगाल ३) बिजन मिलन पात्र वय २४ वर्षे धंदा- मजुरी, रा. ग्राम खादीनन, पोस्ट गोपालनगर, जि. पूर्व मेदनीपुर राज्य पश्चिम बंगाल यांचा मृत्यू झाला.
आशिष आगरवाल यांनी गोडावूनच्या खोली मध्ये कामगारांना ठेवून सदर बाबत अग्निशमन विभाग, विदयुत विभाग, बांधकाम विभाग, पोलीस विभागाची कोणतीही परवानगी न घेता, गोडावून मधील कामगारांच्या जिवीताच्या रक्षणाकरीता कोणतीही ठोस उपाय योजना न करता, हलगर्जी व निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली.
गोडावूनला भीषण आग लागल्याने गोडावूनच्या खोलीत राहणारे १. कमल बार याचा पाण्याच्या टाकीत बुडुन मयत होवुन, तसेच २ बिजन पात्र ३ विश्वजित सेन हे दोघेजण आगी मध्ये गंभीररित्या भाजल्याने मृत्यु झाला.
याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहा. पो. निरी. रविंद्र गोडसे अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Arrested | पादचाऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या ; आठ मोबाईल केले जप्त