पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाल्याची माहिती मिळत आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले आहे. दरम्यान, फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर नाही राहिले तर जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटक करण्याचे वॉरंट काढले आहे.
नाटकांच्या प्रयोगाचे आयोजन करून त्यांचे पैसे दिले नाही म्हणून, जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले आहे.