इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील जीवघेणा हल्ला ही निंदनीय बाब आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ हल्लेखोरांना अटक करुन योग्य ती कारवाईची करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अनिता खरात यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
अनिता खरात यांनी म्हटले की, तहसीलदारांवरील हल्ल्याचा प्रथमतः निषेध करुन पोलीस प्रशासनाला विनंती करते की, जे कोणी हल्लेखोर असतील त्यांना ताबडतोब अटक करून योग्य ती कारवाई करावी. येथून पुढे असे हल्ले होणार नाहीत, यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना योग्य ते संरक्षण द्यावे. शासकीय अधिकारी हे तालुक्यातील गोर-गरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात आणि अशा अधिकाऱ्यावर हल्ला करणे, हे लोकशाहीला धरून नाही.
तहसीलदार श्रीकांत पाटील हे तर नेहमीच आपल्या कामात तत्पर असतात आणि अशा अधिकाऱ्यावर हल्ला होणे ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याचे अनिता खरात यांनी म्हटले आहे.