वाढते वजन हे आरोग्यासाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळेच वजन कमी करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी काहीना काही उपाय केले जातात. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. आले व लिंबाचा रस वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.
आल्यातील काही पोषकघटकांमुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक व अतिरिक्त चरबी यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. लिंबामध्ये पॉलिफेनोल्स घटकामुळे शरीरात जमा होणारी चरबीचे प्रमाण नियंत्रणात येते आणि वजन घटण्यासही मदत मिळते. शिवाय लिंबू पाणी हे डिटॉक्स ड्रिंक म्हणून फिटनेसप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेच. मिठाचे सेवन कमी केल्याने पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकार टाळता येऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी मिठाचे सेवन कमी करणे फार महत्वाचे आहे.
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पाण्याचे जास्त सेवन करा. जास्त पाणी प्यायल्याने तुमची भूक नियंत्रित राहते. चयापचय क्रिया वाढते आणि तुमचे वजनही वेगाने नियंत्रित होते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरातील चरबीही नियंत्रणात राहते.