पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात सीआयएससीई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. उमेदवार मंडळाच्या cisce. org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. सीआयएससीई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर बारावीच्या परीक्षा १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. (ICSE, ISC Board Exam 2023)
दरम्यान, दहावी- बारावीच्या परीक्षा १२ फेब्रुवारीपासून वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीला सुरू होणार असून, २८ मार्चला संपणार आहेत. शेवटचा कला विषयाचा पेपर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत असेल, तर इतर विषयांसाठी सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत परीक्षा होईल.
कला विषयाच्या पेपरचा कालावधी ३ तास आणि इतर विषयांचा कालावधी २ तासाचा असेल. बारावीच्या परीक्षा १२ फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि ३ एप्रिल २०२४ रोजी संपतील. परीक्षा सर्व दिवस दुपारी २ वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल. परीक्षेचा निकाल मे २०२४ मध्ये घोषित केला जाणार असल्याचे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
असं करा वेळापत्रक डाउनलोड ?
1: सर्वप्रथम cisce.org च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
2: वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.
3: तुमच्या स्क्रीनवर PDF उघडेल.
4 : आता तुम्हाला वेळापत्रक दिसेल.
5: आता तपासा आणि डाउनलोड करा