बापू मुळीक
सासवड: सिंगापूर (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी भैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या अर्चना राजाराम लवांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच संगीता वारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी डी.सी शेळकंदे यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी नीलम धोत्रे उपस्थित होत्या.
यावेळी उपसरपंच विशाल लवांडे, सदस्य विक्रांत पवार,सौरभ लवांडे, संगीता वारे, मीना उरसल, चांगुना वाघमारे हे उपस्थित होते.
तसेच शिवसेना जिल्हा अध्यक्ष दिलीप यादव, शिवसेना तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोळे, उमेश गायकवाड युवा सेना जिल्हा उपप्रमुख यांनी सरपंच अर्चना लवांडे यांना पुष्पहार देऊन स्वागत केले.
यावेळी माजी सरपंच दशरथ लवांडे, किर्लोस्कर कंपनीचे युनियन लीडर संदीप लवांडे, शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण लवांडे, सोपान पवार, सुरेश लवांडे, सुनील लवांडे, हनुमंत वारे, श्रीहरी लवांडे, बाळासो वारे, माऊली वारे,अशोक गिरी गोसावी, राजाराम लवांडे, पोलीस पाटील यादवेंद्र उरसळ, तलाठी कुदळे आदी उपस्थित होते.
मागील वर्षाच्या काळात साडेचार कोटीची विकास कामे सिंगापूर गावामध्ये झाल्याचे, समाधान व्यक्त करण्यात आले. पुढील येणाऱ्या काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नवनिर्वाचित सरपंच अर्चना लवांडे यांनी सांगितले.