दीपक खिलारे
इंदापूर : शिवसेना महिला आघाडी (दौंड, बारामती, इंदापूर तालुका) उपजिल्हा संघटकपदी विद्या गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा महिला संघटक सीमा कल्याणकर उपस्थित होत्या.
विद्या गायकवाड यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख अॅड. गीतांजली ढोणे, जिल्हा संघटक सीमा कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत केंद्राच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत केली आहे. त्यांच्या उपजिल्हा संघटकपदी झालेल्या निवडीमुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या वेळी महेश पासलकर, बारामती तालुका प्रमुख स्वप्नील जगताप, युवा सेना प्रमुख दिग्विजय जगताप, अण्णासाहेब काळे आदी उपस्थित होते.