पुणे : मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पुण्यातील मोर्चाला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहाटे पाच वाजता पुण्यात घेतलेल्या सभेला प्रचेड संख्यने समाजबांधव उपस्थित होते. मनोज जरांगेंसोबत मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. विराट संख्येने मराठा समाजाला मुंबईमध्ये दाखल होण्याचे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे. अशातच पुण्यातील भोर तालुक्यामधील संतोष राजशिर्के या तरूणाने एक अनोखा निश्चय केला आहे. हा तरूण पायाने गाडी चालवत भोर ते मुंबई असा जीवघेणा प्रवास करणार आहे. मराठा आरक्षण मिळआलेच पाहिजे, यासाठी हा स्टंट करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
संतोष राजेशिर्के हा तरूण भोर तालुक्यातील गवडी या गावामधील रहिवाशी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी तो हा जीवघेणा स्टंट करणार आहे. पायाने गाडी चालवत भोर ते मुंबई असा जीवघेणा प्रवास करणार आहे. ड्राइवर शेजारच्या पॅसेंजर सीटवर बसून पायाने चारचाकीचे गाडीचं स्टेरिंग नियंत्रित करणार आहे. भोर ते मुंबई हे अंतर सुमारे ३०० किलोमीटर आहे. या निश्चयामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भोर पंचक्रोशीमध्ये संतोष राजेशिर्केच्या स्टंटची जोरदार चर्चा होत आहे. हा जीवघेणा स्टंट करणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत.
सरकारने आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार करावा आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भोरमधून निघालेला राजेशिर्के हा तरुण स्विफ्ट गाडी घेऊन रवाना झाला आहे. याआधीही त्यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी चारचाकी रिव्हर्समध्ये चालवत पुण्याहून मुंबई गाठली होती.