पुणे: मोजणीच्या प्रकरणात एका भूकरमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालातून आज बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला भूकरमापक हा हवेली मोजणी कार्यालयात कार्यरत आहे. तसेच त्याची सध्या चौकशी सुरु आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
(सविस्तर वृत्त थोड्यावेळातच)