पुणे : राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच बाबाजानी दुर्राणी यांनी अजितदादांच्या पक्षाचा निरोप घेतला होता तर इंदापूरमधील प्रवीण माने यांनीही अजित पवारांची साथ सोडली. आता माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. बंद दाराआड त्यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
बबनदादा शिंदे तुतारी हातात घेणार का?
बबनदादा शिंदे तुतारी हातात घेणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे त्यामुळे सोलापूरातील राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवार गटाचे माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिह शिंदे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आज पुण्यात आहेत. पुण्यात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी शिंदे पिता पुत्र पोहोचले आहेत. त्याचे व्हिडीओ आणि फोटो झपाट्यावे व्हायरल झाले आहेत.
दादांनी पवारांची भेट का घेतली?
लोकसभा निवडणुकीत माढ्यामधील मतदारांनी भाजपला नाकारत तुतारी हातात घेतली आहे. बबनदादा शिंदे यांच्या मदतारसंघात शरद पवार यांच्या उमेदवाराला मोठी लीड मिळाल होती. तेव्हा भाजपमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. शरद पवार माढा मतदारसंघासाठी नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत. त्यातच आता बबनदादांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
माढ्यात तुतारीचा वरचष्मा..
माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील तीन तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. मोहिते पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांना आघाडी मिळाली होती.