Shikhar Bank Scam Case : अजित पवारांच्या अडचणी वाढ आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना क्लिनचीट मिळाली असून त्यावर मात्र अण्णा हजारेंचा यांचा आक्षेप आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार असल्याची माहिती समोर अली आहे. अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार असून त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांना वेळ दिला आहे. या याचिकेवर 29 जूनला पुढची सुनावणी होणार आहे.
अजित पवार, सुनेत्रा पवारांना दिलासा
राज्यातील चर्चेत असणारा सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. परंतु मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांना दिलासा दिला. तसेच, या घोटाळ्या प्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचंही पोलिसांनी म्हटलें आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना दिलासा देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना, अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना देखील या प्रकरणी दिलासा देण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी जानेवारी महिन्यात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप अजित पवारांसह इतर आरोपींवर करण्यात आले होते. या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर करत असताना, कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा देण्यात आला आहे.