पुणे: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे या भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच अंकिता ठाकरे या उद्या (दि. ४) राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. अंकिता पाटील यांनी आज वडील हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली. सध्या अंकिता पाटील-ठाकरे या पुणे जिल्हा भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम आहेत. राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का झाल्यानंतर अंकिता लवकरच या पदाचा राजीनामा देणार अशी चिन्ह आहेत.