पिंपरी : किरकोळ कारणांवरून मारहाण करण्याचे प्रमाण वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी भावाला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन ‘तुला ठेवतच नाही, तुला लय माज आला आहे’ असे म्हणून गंभीर जखमी केले. त्रिवेणीनगर चौकातील श्री स्वामी विवेकानंद शाळेसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत दानीश वाजीद शेख (वय-२४, रा. त्रिवेणीनगर, श्री स्वामी विवेकानंद शाळेसमोर, निगडी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून निलेश रेणवा (रा. टॉवर लाईन, म्हेत्रेवस्ती, चिखली) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दानीश शेख याने दोन महिन्यांपूर्वी आरोपी निलेश रेणवा याचा भाऊ दिनेश रेणवा याला शिवीगळ केली होती. याचा राग मनता धरुन आरोपी निलेश व त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादी याचा मित्र अमित सिंग याला शिवीगाळ करुन मारहाण करु लागले. त्यावेळी दानीश शेख त्यांना समजावण्यासाठी गेला. आरोपी निलेश रेणवा याने त्याच्याकडे असलेला कोयता काढून फिर्यादी याला ‘तुला ठेवतच नाही, तुला लय माज आला आहे’ असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.