पिंपरी-चिंचवड : हरवलेला मोबाईल तुमच्याकडे आहे का, अशी विचारणा केली म्हणून पती-पत्नीला शिवीगाळ व बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी (ता. ११) थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी अब्दुल मजीद अन्सारी (वय ३४, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू सहानी (वय ४५, रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरासमोर थांबले असताना आरोपी व त्याचा मुलगा तेथे आले. फिर्यादी यांनी त्यांच्या हरवलेल्या मोबाईलबाबत त्यांना काही माहिती आहे का, अशी विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला आमच्यावर चोरीचा आळ घेतो का, म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.