पुणे : आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात खास सजावट करण्यात आली आहे. यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाला सोन्याचे दागिने परिधान करण्यात आले आहेत. गणपती बाप्पाला चकाकणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं गेलं आहे. तसेच गणपती मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे.
दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासूनच पूजापाठ सुरू आहे. अष्टविनायकाच्या थीममध्ये गाभाऱ्याची सजावट करण्यात आली आहे. तसेच अष्टविनायकाचे फोटो बाप्पाच्या भोवती लावण्यात आले आहेत. अंगारकीनिमित्त गणेश दर्शनासाठी भविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.