MLA Atul Benke : पुणे / राजेंद्र शेळके : अंगणवाडी कर्मचारी कृती समिती जुन्नरच्या वतीने आमदार अतुल बेनके यांना निवेदन देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी होणाऱ्या संपाबाबतच्या मागण्या आमदार बेनके यांच्यासमोर मांडल्या.
अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर २०२३ रोजी संप सुरू होत असून, संपाचा एक भाग म्हणून जुन्नर तालुक्याचे आमदार बेनके यांना निवेदन देऊन मागण्या मांडण्यात आल्या. येत्या हिवाळी अधिवेशनात आपण या मागण्या मांडाव्यात, अशी विनंती आमदार बेनके यांना करण्यात आली. या मागण्याबाबत राज्यातील सर्वच आमदार हे निवेदन दिले आहे.
अंगणवाडी सेविकांच्या वतीने शुभांगी शेटे अध्यक्ष यांनी आपल्या मागण्या आमदार बेनके यांच्यासमोर ठेवताना गेल्या ४० वर्षांपासून शासकीय दर्जा द्या, बालकांना दिला जाणारा आहार, पेसा क्षेत्रातील आहार हा दर्जेदार द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेविका २६०००, मदतनीस १८,००० मानधन द्या, या मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी अंगणवाडी जिल्हा सल्लागार लक्ष्मण जोशी म्हणाले की, अंगणवाडी ताईचा लढा हा आरपार लढा आहे. राज्यातील सर्व आमदार मागण्यांचे निवेदन देऊन हिवाळी अधिवेशनात मागण्याबाबत सकारात्मक निर्णय सरकारने घ्यावा. यासाठी आमदार बेनके यांनी प्रयत्न करावेत. अन्यथा हा लढा तीव्र केला जाईल.
यावेळी आमदार अतुल बेनके यांनी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज महिला सन्मान दाखला देत या सर्व मागण्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन यावेळी अंगणवाडी महिला दिले. यानंतर निवेदन दिले गेले. यावेळी उपस्थित अंगणवाडी कृती समितीचे निलेश दातखिळे, डॉ. अमित बेनके, मनीषा भोर, सुप्रिया खरात, सीमा कुटे, रुक्मिणी लांडे, कौशल्या बोऱ्हाडे जयश्री भागवत याच्यासह ७०० अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.