उरुळी कांचन : जेष्ठ वयोवृद्ध साधारण सत्तरीतले असावेत, गाणगापुरला गेले होते…. मात्र येताना केडगाव चौफुल्यावर उतरावयाचे होते. त्यांची दिशाभूल झाली आणि आजोबा थेट उरूळी कांचनला उतरले. आजोबा दोन दिवस उरळीमध्ये सैरावैरा फिरत होते. मग, केक विक्रेत्या महिला पूनम जाधव यांनी दाखविलेल्या सजगतेने आजोबा त्यांच्या घरी सुखरूप पोहचले आहेत.
मागील चार दिवसापूर्वी सायंकाळची वेळ होती… पूनम जाधव ह्या दुकानात बसून कामाची आवरा आवर करत होत्या. तेव्हा रात्री उशीरा कळाले की, दुकानासमोर कोणीतरी वृद्ध साधारण सत्तरीतले असावेत आणि ते बसले आहेत. सुरूवातीला थोडा वेळ बसले असावेत, असा गैरसमज जाधव यांचा झाला. परंतु नंतर त्यांच्या डोळ्यातील पाणी आणि शुन्यात हरवलेली नजर पाहुन त्यांना काहिसे हायसे वाटले. काळजीने त्यांनी विचापूस केली. दुखावलेले नजरेने आजोबा म्हणाले की, पाय दुखत आहेत म्हणुन बसलोय.
जाधव यांनी जेवण केलय का असे अस्थेने विचारले. तर त्यांनी नाही असे सांगितले. वयोवृद्ध तसेच काहिच सांगत नसून भुकेलेल्या अवस्थेत आहेत. जाधव यांनी तातडीने कोणताच विचार न करता. गावातील एका खानावळीतून जेवनाचा डबा मागितला. बाबा…पोटभर जेवा. काहि काळजी करू नका. मला तुम्ही फक्क फक्त खर खर सांगा मी तुमची मदत करेन. असे जाधव यांनी आजोबांना सांगितले. जेवण दिल्यानंतर आजोबांना पत्ता विचारला. तेव्हा ते केंडगावचा आहे एवढच बोलायचे. त्यानंतर आजोबांना जेवण करायला सांगुन उशिर झाल्यामुळे जाधव घरी गेल्या. आजोबा जेवण करुन गेले असतील असा जाधव यांचा समज झाला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात जाधव आल्या. तेव्हा आजोबा अजुनही तिथेच होते. रात्रभर ते दुकानाच्या समोरच झोपले होते. मग जाधव यांनी त्यांच्याकडे जाऊन विचारपुस करु लागले. अहो बाबा…तुम्ही अजून गेला नाहीत. त्यावेळी त्यांनी हळू हळू त्यांची माहिती देण्यास सुरवात केली. त्यावेळी लक्षात आले बाबांची दिशाभूल झाली आहे. त्यांच्या काही लक्षात येत नव्हते. मी ‘केडगाव’ चा आहे. एवढच सांगत होते.
त्यानंतर जाधव यांनी बाबांना चहा आणि बिस्कीट देऊन केडगावचे सामाजिक कार्यकर्ते धनराजजी मासाळ यांना संपर्क केला. बाबांचा फोटो ही त्यांना पाठवला. दोन मिनिटातच धनराज मासाळ यांचा फोन आला. माझे मित्र आत्ता माझ्यासोबत आहेत. त्यांनी बाबांचा फोटो पाहुन त्यांना ओळखले आहे. आणि ते त्यांचे पाहुणेच आहेत. बाबांना तिथेच थांबवा. त्यांचा मुलगा त्यांना न्यायला येईल असे सांगितले.
पुढच्या पाच मिनिटांतच बाबांच्या मुलाचा फोन जाधव यांना आला. ताई ते माझे वडील आहेत. मी गाडी घेऊन त्यांना न्यायला येतोय असे सांगितले. बाबा शांतपणे शुन्यात नजर लावुन कसलातरी विचार करत बसले होते. अर्ध्या तासात त्यांचा मुलगा न्यायला आला. तेव्हा समजले बाबा २२ फेब्रुवारीला गाणगापूरला जातोय असे सांगुन घरातुन गेले होते. गाणगापूरवरुन येताना चौफुल्याला उतरातचे त्यांच्या लक्षात आले नाही आणि ते उरुळी कांचनला उतरले. आणि त्यांची दिशाभूल झाली.
दरम्यान, मुलाला हा घडलेला सर्व प्रकार सांगताना मात्र बाबांच्या डोळ्यातुन आपोआप पाणी येत होते. मुलाचेही डोळे पाणावले होते. त्यानंतर बाबा आनंदाने मुलासोबत सुखरूप घरी गेले. जाताना मुलाच्या आणि बाबांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहुन खुप छान वाटले. या सर्वात धनराज मासाळ सरांची खुप मदत झाली. मुलासोबत घरी परतताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. संपर्कातून त्यांना त्यांचे कुटूंब भेटले याचा आनंद जाधव यांनाही झाला होता. खरच जर असे कोणी आजोबा दिसले तर त्यांची नक्की विचारपुस करा कदाचित, आपल्यामुळे कोणीतरी घरी सुखरूप जाईन याकल्पनेने जाधव यांचेही तेव्हा मन भरून आले होते.
शब्दांकन : युनूस तांबोळी