राजेंद्रकुमार शेळके
Ancient | पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे उभेवाडी गावच्या दक्षिण डोंगर रांगेत उभेवाडीच्या डोंगरात सुमारे १५०० वर्षे अति प्राचीन मंकाळा खेळाचे अवशेष सापडले आहे. पिरंगुट येथील सरनौबत पोपटराव व धाकटे सरनौबत मंगेश बापू गोळे पाटील हे ट्रेकिंग साठी या डोंगराव गेले असता त्यांना हे अवशेष दिसून आले. काल झालेल्या पावसामुळे डोंगरावरील पसिसर स्वच्छ झाल्यामुले हे खेळाचे अवशेष दिसून आले.
या अवशेष्याचा शेजारी १२ इंच लांब, ८ इंच रुंद शिवपिंड सुद्धा आढळली आहे. डोंगररांगा मधील दगडांमध्ये कोरीव काम केलेली ही पिंड आहे. मंकाळा खेळ हा जरी आफ्रिका खंडात खेळले जात असले तरी भारतात जवळपास २५०० वर्षे पासून खेळला जातो, मुख्यतो व्यापारी मार्ग, टेहळणी जागा या ठिकाणी हे खेळ खेळले जातात. पिरंगुटचे अतिप्राचीन नाव प्रियंगुवाट असल्याने असे खेळ सापडणे मोठी गोष्ट आहे.
या खेळावर महाराष्ट्र मध्ये अभ्यास करत असलेले नाशिक येथील पुरातत्व विभागाचे सोज्वळ साळी यांना तात्काळ फोटो, लोकेशन माहिती पाठवली. आम्ही यापूर्वी मारुंजी डोंगरावर आशियातील सर्वात मोठे वाघ बकरी खेळ अवशेष शोधले होते,आता या रांगेत अजून काही अवशेष आहेत का याबाबत माहिती घेतली जाणार असल्याचे ते बोल्ले.
सीतेचा डोंगर रांगेत कदाचित अजून खेळ सापडतील, लवकरच या रांगेत संशोधन साठी आम्ही सर्व दुर्गप्रेमी जाणार आहोत. त्यात दुर्गमित्र अनिल ठेबेकर(ए टी) ही होते. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मारुंजी टेकडी येथे फेब्रुवारी २०२२ रोजी ४१ खेळ शोधण्यात यश आले होते. त्यानंतर कापूरहोळ येथे ३५ तर वैष्णवधाम येथे ३०, भोर तालुक्यात १७ असे अनेक खेळ आजही मोठ्या संख्येने मिळत आहे.
या खेळांचे नोंदणी करण्याचे काम ‘प्राचीन पट खेळ संवर्धन मोहिम’ अंतर्गत सुरु असून त्यात मी व माझे सहकारी ऍड. मारुती गोळे, ऋषिकेश राणे हे करीत आहेत. हे खेळ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे मुख्य कारण असे की, खेळ ही एक संस्कृती व परंपरा असल्याचे तसेच परदेशातील व्यापारी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील व्यापारी मार्गांवरून जात असल्याचे या संशोधनातून सिद्ध होते.
मंकला हा खेळ जरी आफ्रिका या देशातील पारंपरिक खेळ असला तरी भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये विश्रांतीच्या वेळेत तसेच करमणुकीसाठी खेळत असल्याचे दिसते. त्यामुळे हे सर्व सापडत असलेले खेळ संवर्धित होणे काळाची गरज आहे. या प्राचीन ठेव्याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देऊन ते नष्ट होणार नाही याची उपाययोजना केली पाहिजे असे मत पुरातत्व विभागाचे नाशिकचे सोज्वळ साळी यांनी व्यक्त केले.