युनूस तांबोळी
शिरुर : आळेफाटा (ता.जुन्नर) येथील अनंतराव कणसे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयास नॅक बी राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. कुलस्वामी मेडिकल फाउंडेशनचे अनंतराव कणसे होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे नॅक बी (२.२७) मूल्यांकन प्राप्त झाले. मूल्यांकन प्रक्रिया ११ व १२ मार्च २०२४ रोजी झाली.
शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासक्रमाचे नियोजन, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता व संशोधन कार्य, समाजोपयोगी उपक्रम, सुविधा, क्रीडा व सांस्कृतिक विभागाची कामगिरी, पर्यावरणपूरक योजनाबाबतचा अहवाल प्राचार्य डॉ. के. व्ही. घोलप व नॅक समन्वयक डॉ. आर. के. घोलप यांनी समितीला सादर केला. त्याआधारे हे मूल्यांकन प्रक्रियेत सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी व विविध आस्थापनांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरस्वती कणसे, संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कणसे, सचिव डॉ. निखिल कणसे व सदस्या डॉ. योगेश्री कणसे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालय येणाऱ्या काळातही शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील.
पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्नित महाविद्यालयांमध्ये पहिलेच नॅक मानांकित महाविद्यालय आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामधील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये समाविष्ट झाले आहे. या अगोदरही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता विद्यापीठ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध केलेली आहे. या महाविद्यालयामध्ये बी.एच.एम.एस. अभ्यासक्रम शिकवला जात असल्याचे प्राचार्य डॉ. के. व्ही. घोलप यांनी सांगितले.