पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी काळ उपोषण सोडलं. राज्य सरकारनं मनोज जरांगे यांना एक राजपत्र प्रकाशित करुन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. या आंदोलनानंतर नेमकं कोण जिंकलं ? या पार्श्वभूमीवर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठ्यांना काल दिलेलं आरक्षण म्हणजे फसती है दुनिया फसानेवाला चाहिये, कोणतेही आश्वासनपूर्ती न करता हा मोर्चा गुंडाळला गेला आहे, असं आनंद दवे म्हणाले आहेत.
तेरीभी जय मेरी भी जय असं करत आपण दोघ पण विन-विन सिच्युएशन मध्ये येऊ. असं ठरवून केलं गेल की कायं असं वाटतं आहे, अशी शंका व्यक्त करत मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी सरकारच्या भूमिकेवर आनंद दवे यांनी जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण म्हणजे फसती दुनिया फसानेवाला चाहिये असं आहे.
मराठा समाजाला यातून काहीही नवीन मिळालेलं नाही, फक्त शब्दछल करण्यात आलेला आहे. या राजपत्रावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत, या हरकतींवर नंतर आक्षेप घेण्यात येतील आणि हे प्रकरण पुन्हा एकदा रेंगाळणार आहे, असं आनंद दवे म्हणाले.