इंदापूर : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू सन 2023-24 च्या 23 व्या ऊस गळीत हंगामाचा कारखान्याच्या 46 ज्येष्ठ सभासदांच्या शुभहस्ते साधेपणाने परंतु उत्साही वातावरणामध्ये मंगळवारी (दि.31) शुभारंभ करण्यात आला.
चालू गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला पहिला उचल रु. 2500 प्रमाणे देण्यात येणार आहे. त्यानंतरचे ऊस बिलाचे हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे देण्यात येतील. निरा भीमा कारखाना इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्यास बांधील आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालु गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल. शेतकऱ्यांनी आपल्या सर्व ऊस निरा भिमा कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अनिल पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, सुधीर पाटील, प्रताप पाटील, दत्तात्रय शिर्के, दादासो घोगरे, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, सुरेश मेहेर, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबन देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, अमरदीप काळकुटे, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, तानाजी नाईक, मोहन गुळवे, कार्यकारी संचालक हेमंत माने, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.