लोणी काळभोर : मुलांमध्ये अनेक सुप्तगुण असतात. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत नैतिक मुल्य आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नेहमीच अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयात पर्यावरणपूरक आकाशकंदील मंगळवारी (ता.१५) बनविण्यात आले.
पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल मधील निसर्ग साधना इकोक्लब व हरितसेना अंतर्गत या पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच आकर्षक कंदील, तोरणे आणि रंगीत पणत्या तयार केल्या.
विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागद, खडू, माती यांच्या साहाय्याने मुलांनी सुंदर आकाशकंदील आणि नक्षीदार पणत्या रंगवल्या. विद्यार्थ्यांना यासाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका शर्मिला साळुंखे यांच्या मार्गदर्शन मिळाले. तर या क्रियाशील उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले. पालकांनीही विद्यार्थ्यांना आकर्षित रंगीत कागद उपलब्ध करून दिले.
विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने रंगीत कागदांचे कंदील बनवण्यात रममाण झाले होते. रंगीबेरंगी कंदील, पणत्या आणि मुलांचा उत्साह यामुळे अत्यंत उत्साहाचे, आनंदाचे वातावरण येथे निर्माण झाले होते. ‘दिवाळीच्या उत्सवात आपल्या कुठल्याच कृतीतून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी,’अशी यावेळी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
दरम्यान, स्वनिर्मितीतून सुंदर आकाश कंदील तयार झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आकाश कंदील तयार करण्यासाठी शाळेतील टाकाऊ वस्तू तक्ते, कार्डशीट पेपर, बेगडी पेपर, टिंबे पेपर, वनसाईड कलर पेपर, दोरा, फेविकॉल घोटीव कागद इत्यादींचा वापर करून आकाश कंदील तयार करण्यात आले. यातून आपली परंपरा, सण, उत्सव यांचे महत्त्व सहजपणे समजून येते.