पुणे : सात वर्षाच्या चिमुकलीला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच तिला गटाराच्या खड्ड्यात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव (ता. हवेली) येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.17 डिसेंबर) सायंकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव येथील ऊसतोड कामगार पत्नीला घेऊन खासगी दवाखान्यात गेला होता. यांची सात वर्षाची मुलगी घरी एकटीच होती. तिला एकटीला पाहून एका अज्ञात व्यक्ती तिथे पोहचला. आणि अचानक मुलीचा गळा आवळून तिला जबर मारहाण केली. याबरोबरच मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करुन गटाराच्या खड्ड्यात फेकून दिले. यात मुलगी जखमी झाली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पो.हवा.सुजाता भुजबळ, पो.कॉ. दिपक यादव, अमोल खांडेकर, राजकुमार भिसे यांनी घटनास्थळी जाऊन पुढील तपास सुरु केला आहे.
नेमकं त्या चिमुकलीसोबत अशी मारहाण कशामुळे करण्यात आले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.