पुणे : राज्यात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर मतदान पार पडले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला आहे.