पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या ११ जागांसाठी मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली असून सायकंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवारही चौथ्या टप्प्यात मैदानात आहेत. शिरुर आणि अहमदनगर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी विशेष लक्ष दिले आहे. खासदार अमोल कोल्हे आणि निलेश लंकेंच्या माध्यमातून शरद पवारांची प्रतिष्ठा या दोन मतदारसंघात पणाली लागली आहे. परंतु, पैसेवाटप, बोगस मतदानाचा प्रयत्न आणि दमदाटीच्या आरोपामुळे हे दोन मतदारसंघात राज्यात चांगलेच चर्चेत आले आहेत.
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत, असे ट्विट करत शिरूरचे खासदार कोल्हे यांनी केले आहे. शिरुर मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. खासदार कोल्हे यांनी एक व्हिडिओही ट्विट केला आहे, ज्यामध्ये मतदान केंद्रात गोंधळ सुरू असल्याचे दिसून येते. पोलिंग एजंट, निवडणूक अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये होणारा संवाद दिसून येत आहे.
????मांजरी ( हडपसर विधानसभा)
शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रशासनाची अनागोंदी..!
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत!@ECISVEEP @CEO_Maharashtra @CollectorPune @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline… pic.twitter.com/EYPl4PIC5k
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 13, 2024
;
शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुथच्या परिसरात घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे, असल्याचे खासदार अमोल कोल्हेंनी म्हटले आहे .तसेच, आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील बुथ परिसरातील घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप बंद करण्याचे तसेच संबंधित पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत, अशी विनंतीही केल्याचे अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे बुथच्या परिसरात घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे.
तरी आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील… pic.twitter.com/ygGDMZUd66
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 13, 2024