पुणे : शिवाजी आढळराव पाटील यांना चौथ्या पक्ष बदलाच्या शुभेच्छा, असे म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांवर खरपूस टीका केली आहे. गेल्या लोकसभेला ज्यांनी आव्हान दिले, आता त्यांनाच अजित पवार उमेदवार करणार, असा खोचक टोलाही कोल्हे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभं रहा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे शिवाजी आढळराव पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माझं मतही विचारले. त्यावर ते हरकत नसल्याचेही म्हटल्याची माहिती आढळराव पाटलांनी दिली. ज्यावेळी सर्वांची यादी जाहीर केली जाईल, तेव्हा सर्व उमदेवारांची एकत्रित नावे जाहीर करू, असं मुख्यमंत्री शिंदे म्हटल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.