Ambegaon News : आंबेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील गंगापूर खुर्द गावातील गाडेकरवाडी येथे एक धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावंडांचा ओढ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
आर्यन अरुण काळे (वय ११) आणि अंजली अरुण काळे (वय १५) अशी मृत भावंडांची नावे आहेत. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतदेहाचे शवविच्छेदन शुक्रवारी (ता. ४) सकाळी करण्यात आले. या घटनेने काळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत आदित्य जाधव यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात असणाऱ्या गाडेकरवाडी येथील वरासुबाई मंदिराशेजारी असणाऱ्या ओढ्यामध्ये खेकडे पकडण्यासाठी आर्यन आणि अंजली गेले होते. (Ambegaon News ) बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने घरातील व्यक्तींनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.
दरम्यान, शोध घेताना दोघे ओढ्यात मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे नागरिकांकाकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले असता ते निपचित पडल्याचे आढळले. (Ambegaon News ) मंचर येथील रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना रुग्णवाहिकेतून गुरुवारी रात्री साडेआठ वाजता घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, शुक्रवारी (ता. ४) सकाळी दोघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बहिण-भावांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा अशी माहिती समोर येत आहे. (Ambegaon News ) या प्रकरणाचा तपास घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वागज करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News | बिबट्याची दहशत… 3 शेळ्यांचा पाडला फडशा …!