पुणे : काही दिवसापूर्वी झालेल्या बदली रोजनदारी तसेच विविध मागण्यासाठी वेळोवेळी आंदोलन व पत्रव्यवहार करूनही आतापर्यंत पीएमपीएमएल प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, त्यामुळे २९ जुलै पासून बेमुदत सर्व 15 डेपो बंद करणार असल्याचा इशाराच पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला दिला आहे. तसेच या सर्व डेपो बंद निर्णयाला पीएमपीएमएलचे व्यवस्थापक संचालक व सहव्यवस्थापक संचालक नितीन नार्वेकर आणि प्रशासन जबाबदार राहील असं निवेदनात म्हटले आहे.
काय म्हणाले प्रमोद नाना भानगिरे?
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या बदली रोजनदारी सेवकास कायम करण्याबाबत व फरकाच्या हपत्याची रक्कम मिळण्याबाबत तसेच पदोन्नती या विषयाबाबत लवकरात लवकर संचालक मंडळाची बोर्ड मीटिंग घेण्याबाबत आम्ही विनंती केली होती. मात्र, आज तगायत मंडळाची बोर्ड मीटिंग लावण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी (दि. 20) सर्व पीएमपीएमएलच्या संघटनांनी प्रमोद नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व संघटनांनी पाठिंबा देवून कृती समिति स्थापन केली आहे.
दरम्यान, सर्व संघटनांनी वेळोवेळी आंदोलन व पत्रव्यवहार करूनही आतापर्यंत पीएमपीएमएल प्रशासनाने कोणतातही ठोस निर्णय घेतला नसल्याने. सोमवार (दि. 29) पासून कृती समितीने बेमुदत सर्व 15 डेपो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पीएमपीएमएलचे व्यवस्थापक संचालक व सहव्यवस्थापक संचालक नितीन नार्वेकर जबाबदार राहतील, असे प्रमोद (नाना) भानगिरे यांनी निवेदनात म्हटले आहे.