Alandi News पुणे : काल देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं.आज आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असतानापालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. Alandi News यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. Alandi News या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. Alandi News
मंदिर व्यवस्थापनाने यावर्षी केवळ ७५ दिंड्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला. टाळ भिरकावत वारकऱ्याने पोलिसांना प्रतिकार केल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराबाहेर ही घटना घडली आहे.
घटनेचा निषेध करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.’
काय आहे प्रकरण
पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थाने ठरवलं आहे. तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे. असं असताना काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.